जळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमानिमित्त भव्य भक्तिमय रॅली

रावेर (प्रतिनिधी): स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आज, दि. २९ जुलै २०२६ (बुधवार) रोजी आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भव्य भक्तिमय रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी श्री. वाळके साहेब उपस्थित होते. स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष श्री. रविंद्र पवार, संचालिका सौ. सुखदा पवार, कृषी विभागाचे श्री. काळे साहेब, रावेर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सीमा जमादार, सौ. प्रतिभा पाटील तसेच नगरसेवक श्री. राजू शिंदे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेले विविध संत-महंत, गुरु-शिष्य परंपरा तसेच वारकरी संप्रदायातील वेशभूषेचे देखावे. आकर्षक वेशभूषा, अभंग, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले.

स्वामी एज्युकेशनल ग्रुपच्या तिन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या भव्य मिरवणुकीने संपूर्ण रावेर शहर दुमदुमून गेले.

रॅलीदरम्यान रावेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. भास्कर महाजन, श्री. पद्माकर महाजन, श्री. रवी महाजन तसेच शहरातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिकांनी संतांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पूजन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सचिव सौ. मनीषा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या भक्तिमय रॅलीतून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा, गुरुंचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button