जळगावताज्या बातम्या

मोरव्हाळ येथे जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती

रावेर (प्रतिनिधी): जागतिक रेबीज प्रतिबंधक दिनानिमित्त मोरव्हाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रेबीजसह विविध आजारांपासून बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे, लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती भामरे आणि डॉ. रिजवान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील होते.

आरोग्य सेवक योगेश वाल्मीक कापडणे यांनी विद्यार्थ्यांना रेबीजचा संसर्ग कसा होतो, त्यापासून बचावाचे उपाय, कुत्रा किंवा इतर प्राण्याने चावा घेतल्यानंतर तातडीने कोणती खबरदारी घ्यावी आणि वेळेत वैद्यकीय उपचार घेणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी ‘एकत्रितपणे अधिक बळकट – रेबीजमुक्त समाजासाठी!’ या संदेशातून रेबीज प्रतिबंधासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. माहिती फलकाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना रेबीजविषयक प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button