ताज्या बातम्याशासन निर्णय

मोबाईल विक्रेत्यांचा ‘नो यूपीआय डे’; २ ऑक्टोबरला व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन

₹२ हजारांवरील काही UPI व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू होणार; शुल्काला विरोध म्हणून देशभरातील मोबाईल विक्रेत्यांचा निषेध

UPI व्यापारी व्यवहारांवरील प्रस्तावित Merchant Discount Rate (MDR) ला विरोध करण्यासाठी देशभरातील मोबाईल विक्रेते २ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘No UPI Day’ पाळणार आहेत. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने (AIMRA) या आंदोलनाचे आवाहन केले आहे.

या दिवशी सहभागी मोबाईल विक्रेते UPI QR कोडवर काळे कापड लावून UPI पेमेंट स्वीकारणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा निर्णय UPI किंवा डिजिटल पेमेंटच्या विरोधात नसून व्यापाऱ्यांवरील प्रस्तावित अतिरिक्त खर्चाबाबतचा निषेध असल्याचे AIMRAकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

१५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

नव्या व्यवस्थेनुसार ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू होणार आहे. मात्र व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांवर शुल्क राहणार नाही. ₹२,००० पर्यंतचे पात्र व्यापारी व्यवहार आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी असलेल्या शून्य-MDR व्यवस्थेतील व्यवहारही शुल्कमुक्त राहतील. सरकारच्या माहितीनुसार सुमारे ९६ टक्के P2M व्यवहारांवर या बदलाचा परिणाम होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button