जळगावताज्या बातम्या

मार्चिंग स्पर्धेत पाल येथील वांद्रेकर विद्यालयाच्या एनसीसी पथकाची अव्वल कामगिरी

१८ महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

रावेर (प्रतिनिधी) : १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर-डायरेक्टरेट मार्चिंग स्पर्धेत पाल येथील वांद्रेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एनसीसी पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेत एनसीसीच्या विविध पथकांनी सहभाग घेतला होता. शिस्तबद्ध संचलन, समन्वय आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर वांद्रेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षकांची मने जिंकत विजेतेपद मिळविले. या यशामुळे संघाची पुढील जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेतील विजेत्या पथकाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामागे एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रशिक्षकांचे परिश्रम तसेच विद्यार्थ्यांची नियमित सरावातील मेहनत महत्त्वाची ठरल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button