जळगावताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ४० मिरवणुका; शहरात उत्साहाचे वातावरण

भुसावळ (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात विविध भागांतून सुमारे ४० मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीसह मिरवणुका काढण्यात येतील.

मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनीही उत्साहात आणि नियमांचे पालन करत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button