
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी व वीर बाल दिनानिमित्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या १०१ जयंतीनिमित्त आणि वीर बाल दिनानिमित्त शुक्रवारी, दि. 26 डिसेंबर रोजी रात्री भारतीय जनता पार्टीच्या व्यापार आघाडीतर्फे शहराचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते जळगाव रेल्वे स्थानकावरील 100 गरजू बांधवांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, बाजार समिती सदस्य उद्योजक अशोक राठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप व्यापारा आघाडीचे अध्यक्ष विनय बाहेती, पदाधिकारी सुरेंद्र अग्रवाल, भूषण देपुरा, उमेश जैन, मुकेश कुकरेजा, जितेंद्र चव्हाण, राकेश लड्डा, मनीष ओझा, किर्तन शेजपारा व पदाधिकारी यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयेश भावसार, जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, मनोज सोनवणे महेश चौधरी, नीलू आबा यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




