आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाशासकीय

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची विवरे खु ग्रामपंचायतीस भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा घेतला आढावा

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मंगळवार दि.९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत विवरे खुर्द, ता. रावेर येथे भेट देऊन अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.

भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती घेतली. तसेच स्पर्धेमध्ये प्रभावी सहभाग कसा वाढविता येईल, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

ग्रामपंचायतीतील विविध समित्यांची रचना, त्यांचे कामकाज, समितीचे विविध रजिस्टर तसेच दैनंदिन प्रशासनात्मक कामे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी दर्जेदार नियोजन व सातत्यपूर्ण कामकाज आवश्यक असल्याचे नमूद करत त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीतील वृक्ष लागवड, विशेषत: “मियावाकी” वृक्ष लागवड स्थळाची पाहणी केली. तसेच अंगणवाडी व शाळेची पाहणी करून तेथील आहार चव तपासणी केली. पोषणमूल्य वाढीसाठी आहारामध्ये शेवगा शेंगा व सोया यांचा अधिक प्रमाणात वापर करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

तसेच अभियानांतर्गत असलेल्या १ ते ४७ प्रश्नावली संदर्भात सुसूत्र तयारी करून सर्व निकष पूर्ण करण्याच्या अनुषंगाने योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळणार असून स्पर्धेमध्ये उत्तम यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button