आरोग्यजळगावताज्या बातम्यासामाजिक

मॅक्रो व्हिजन स्कूल अकॅडमी, रावेर येथे वाहन चालकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर

रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन स्कूल अकॅडमी, रावेर येथे शाळेच्या वाहन चालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रावेर झोन येथे कार्यरत असलेल्या आरटीओ इन्स्पेक्टर श्रीमती अत्तरदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

या मार्गदर्शन सत्रामध्ये त्यांनी शालेय वाहन चालकांनी पाळावयाचे रहदारीचे नियम, वाहन चालविताना घ्यावयाची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी, वेगमर्यादा, वाहनांची नियमित तपासणी याबाबत सविस्तर आणि सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी, सिग्नलचे पालन व शिस्तबद्ध वाहन चालविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांचे प्राण सुरक्षित ठेवणे ही वाहन चालकांची मोठी जबाबदारी असून, प्रत्येक चालकाने नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीमती अत्तरदे यांनी यावेळी केले.

या उपक्रमामुळे शाळेच्या वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण झाली असून सुरक्षित वाहन चालविण्याची जाणीव अधिक दृढ झाली आहे. या कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर तसेच शाळेतील सर्व बस वाहक व चालक उपस्थित होते.

शाळेच्या व्यवस्थापनाने अशा उपयुक्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी शाळेचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड.प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांचेकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button