जळगावक्रीडाताज्या बातम्या

शिवफुले आखाड्याची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी

युद्धकला चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंची पदकांची लयलूट

रावेर (प्रतिनिधी) : रावेर येथील शिवफुले मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंनी नाशिक येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य मर्दानी युद्धकला चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली. दि. ८ व ९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत आखाड्याच्या खेळाडूंनी काठी, तलवार, पट्टा, भाला आणि भालाफेक आदी युद्धकला प्रकारांमध्ये कौशल्याचे प्रदर्शन केले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्री-ज्युनियर, सब-ज्युनियर आणि सीनियर अशा विविध वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्री-ज्युनियर गटात हेमांशी बारी हिने काठी प्रकारात सुवर्णपदक, तर तलवार प्रकारात रौप्यपदक मिळविले. चेतना महाजन हिने तलवार प्रकारात सुवर्ण, तर काठी प्रकारात रौप्यपदक पटकावले. तृप्ती महाजन हिने काठी प्रकारात रौप्यपदक मिळविले.

सब-ज्युनियर व सीनियर गटातही यश

सब-ज्युनियर गटात समृद्धी महाजन हिने काठी व तलवार या दोन्ही प्रकारांत रौप्यपदक मिळविले. प्रांजल चौधरी हिने काठी प्रकारात सुवर्ण व पट्टा प्रकारात रौप्यपदक पटकावले. पौर्णिमा महाजन हिने काठी प्रकारात सुवर्ण, तर भालाफेक प्रकारात रौप्यपदक मिळविले. तृष्णा महाजन हिने काठी व भाला या दोन्ही प्रकारांत रौप्यपदकांची कमाई केली.

सीनियर गटातही शिवफुले आखाड्याच्या खेळाडूंनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. ईश्वरी महाजन हिने काठी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. चैताली महाजन हिने पट्टा प्रकारात सुवर्ण, तर काठी प्रकारात रौप्यपदक मिळविले. महिमा महाजन हिने काठीमध्ये सुवर्ण व तलवार प्रकारात रौप्यपदक मिळविले. काजल महाजन हिने तलवार प्रकारात सुवर्ण, तर भालाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावले. पल्लवी महाजन हिने पट्टा प्रकारात सुवर्ण, तर तलवार प्रकारात रौप्यपदक मिळविले.

या सर्व खेळाडूंना युवराज माळी व दिवाकर प्रजापती यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रावेर नगराध्यक्ष संगिता महाजन, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल महाजन, मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, उपाध्यक्ष भास्कर महाजन, चेअरमन संतोष अग्रवाल, अध्यक्ष देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले आणि सचिव अक्षय अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button