जळगावताज्या बातम्याशासकीय

राजमाता जिजाऊ अभियानातून रावेरला पाच बसची भेट

नवीन एसटी बससेवेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

रावेर (प्रतिनिधी): राज्य परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ अभियान’ अंतर्गत रावेर आगाराला पाच नवीन एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या बससेवेचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. त्यामुळे रावेर परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे होते. त्यांनी प्रवाशांच्या सुविधांसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवीन बसमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सदस्य रेश्मा धनके, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती गोमतीबाई वाघ, माजी सभापती कल्पना महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अरुण अंबार, राजेश शिंदे, अरुण शिंदे, शोभा अग्रवाल, नितीन पाटील, भाजप लोकसभा समन्वयक सुनील पाटील, उमेश महाजन यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

नव्या एसटी बससेवेला प्रारंभ

रावेर आगाराचे व्यवस्थापक किशोर ममर यांच्या उपस्थितीत नवीन बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी रोहिणी आमदारांच्या हस्ते, दर्शन, आमदार महाजन यांच्या हस्ते नवीन एसटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. नवीन बस आगारातून कार्यक्षेत्रातील विविध मार्गांवर धावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button