
जळगाव (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.




