जळगावताज्या बातम्यानिवडनिवडणूकराजकारण

जळगाव मनपा निवडणूक : शिंदेसेनेचे डॉ. गौरव सोनवणे व मनोज चौधरी विजयी!

जळगाव (प्रतिनिधी) : मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाले असून मतदानापूर्वीचे शिंदेसेनेचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. जळगाव महापालिकेत शिंदेसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ मधून मनोज चौधरी बिनविरोध झाले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राहुल लोखंडे यांनी माघार घेतल्याने चौधरी हे बिनविरोध झाले आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही बिनविरोध झालेल्या उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, प्रभाग क्रमांक 18-अ मधून उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. दरम्यान, चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button