जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली असून निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांची वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शाळांकडूनही विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत असून निकाल पाहताना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेलाही वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी आपला सीट नंबर आणि आईचे नाव तयार ठेवावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button