
गुरुपौर्णिमेनिमित्त पाल येथील आश्रम वृंदावन धाम येथे विविध कार्यक्रम
पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : सूर्यनारायणाच्या उदयनाने आंधकाराचा अस्त होतो तसेच साधकांच्या अंगी मोहमायेच्या अज्ञान अंधःकारला समाप्त करण्याकरिता गुरूच्या ज्ञानरूपी तेजाने प्रकाशित केले जाते. गुरू जन्म मारणाच्या चक्रातून सुटका करून मुक्तीचे मार्ग दाखवून साधकांचा उधार करतात, असे परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य विद्यमान पदस्थ संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिनी आपल्या अमृत वाणीतून देशभरातून आलेल्या लाखो साधकांना उपदेश दिला.
परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाम पाल येथील श्री हरी मंदिरात स्थित पूज्य बापूजीच्या समाधी स्थळी गुरुपौर्णिमा पर्वानिमित्त सकाळी पाच वाजेला पदस्थ संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांच्याहस्ते सदगुरु पादुका पूजन चैतन्य साधकांच्या सानिध्यात झाले.
भक्तांना गुरुदिक्षा प्रदान
गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या हजारो भाविक भक्तांनी स्वईच्छेने मांसाहार व नशेचा कायमस्वरूपी त्याग करून गुरुदेवच्या भक्तिमार्गात येऊन चैतन्य साधक होण्याची गुरुदिक्षा प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे ग्राम, तालुका, जिल्हा समितीच्या सदस्यांचे तसेच पौर्णिमा व्रतधारी, भक्ती सभा सदस्य, ध्यान केंद्र धारी यांचा सत्कार करण्यात आले.
तीनशे किलोमीटर हून पायी दिंडी दाखल
मध्यप्रदेश खंडवा तसेच खरगोन, इंदोर व महाराष्ट्रातून छत्रपती संभाजी नगर जिल्हा, कन्नड हुन 300 किमी चा आंतर ओलांडून ९ जुलै रोजी पाल वृंदावन धाम आश्रमात पायी दिंडी दाखल झाली. त्यांच्या महा प्रसादी सेवे करिता शेरीनाका व गारबर्डी हनुमान मंदिराजवळ चैतन्य साधक युवा समिती पालतर्फे आणि १० जुलै रोजी चैतन्य साधक परिवारंतर्फे महाप्रसाद वितरण करण्यात आले.
मोफत सामुदाईक आरोग्य शिबीर
मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या सहभागाने आश्रमात मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात रावेर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनाची सुविधा असलेले हॉस्पिटल तसेच गिरीश भाऊ फॉउंडेशनतर्फे दंत रोग व नेत्र विकार तपासणीच्या मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिले. सिव्हिल सर्जन डॉ. किरण पाटील यांनी या शिबिरास भेट दिली.
स्वयंसेवकांकडून डिजिटल वेबसाईट ची प्रस्तुती
पाल आश्रमासहित इतर ठिकाणी विविध गतिविधी व परम पूज्य बापूजी आणि श्रधेय बाबाजी यांचे सत्संग ऑनलाईन साधकांपर्यंत पोहचण्यासाठी चैतन्य स्वयंसेवकांकडून डिजिटल वेबसाईड ची प्रस्तुती करण्यात आली. चैतन्य साधक परिवारातर्फे दहावी व बारावीत ७५ टक्यांच्या वर गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देऊन पदस्थ श्रधेय संत गोपाल चैतन्य महाराज यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
लाखो साधकांनी घेतला सत्संगाचा लाभ
या महोत्सवात आश्रम समर्पित श्याम चैतन्य, शिव चैतन्य, दिव्य चैतन्य, ब्रज चैतन्य, नवनीत चैतन्य, राधे चैतन्य, रमण चैतन्य, हरीश चैतन्य, सर्व चैतन्य, ऋषीं चैतन्य, शुभ चैतन्य, ललित चैतन्य,राम चैतन्य, सह मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, भिकनगाव आमदार झूमा सोलंकी, एन एस यू आय सरचिटणीस धनंजय चौधरी, भा ज पा महिला प्रदेश अध्यक्ष केतकी पाटील, राज्य परिषद सदस्य गोमती बारेला,भाजप प्रदेश सदस्य उत्तमराव राठोड, तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक विशाल जायसवाल, पाल उपनिरीक्षक अविनाश राठोड, शाश्रज्ञ् कृषी विज्ञान केंद्र महेश महाजन, गट शिक्षण अधिकारी चव्हाणआदी सह लाखो चैतन्य साधक परिवारानी पूज्य बापूजी समाधी दर्शन व सत्संग अमृताचा लाभ घेतला.