आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

अवैध गुटखा वाहतुक करणारा संशयित स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद!

मुक्ताईनगर येथे मोठी कारवाई, रु.१०,१९,०२० किमतीचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हात अवैध गुटखा वाहतुक व विक्रीचे प्रमाण वाढल्याने अशा जणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने अवैध गुटखा करणाऱ्या वाहन चालकास जेरबंद केले. मुक्ताईनगर पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे रु.१०,१९,०२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपणीय बातमीदारामार्फत एका वाहनात अवैध गुटख्याची वाहतुक होत असल्याची बातमी मिळाली. वाहन हे मुक्ताईनगर शहरातुन ब-हाणपुर (म.प्र) ते छत्रपती संभाजी नगर या दिशेने जाणार होते. त्यानुसार, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला पोहचुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन कडील पथक पुरनाड फाटा या ठिकाणी जावुन थांबलो. या ठिकाणी संशीयत वाहन हे भरधाव वेगात पुरनाड फाट्याकडे येतांना दिसले. पथकाने वाहनातील चालकास हात देवुन थांबविण्याचा प्रयत्न केला पंरतु तो भरधाव वेगात खामखेडा गावाकडे निघुन गेला. त्यावरुन पथकाने वाहनाचा पाठलाग करुन पांढ-या रंगाचे मारोती सुझ्गुकी कंपणीची अरटीगा (क्र. MH-४६८१०६५) हे वाहन थांबवुन वाहन अवैध गुटखा असल्याने वाहनातील चालक अरबाज नौशाद बेग (वय-३० वर्षे रा-काझी, हाऊस, खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर) यास ताब्यात घेतले.

या कारवाईत रु. १०,१९,०२० किंमतीचा रजनीगंधा सुंगधीत पानमसाला व करमचंद प्रिमियन पान मसाला, मिराज तंबाखु, विमल पान मसालास, पानपराग पान मसाला, जाफराणी जार्दा व ताब्यातील वाहन तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल ताब्यात मिळुन आला.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, विजय पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र चौधरी, सलिम तडवी, छगन तायडे, रतनहरी गिते, हेंमत पाटील, गोविंद सुरवाडे, गोविंद पवार यांचा सह्भाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button