क्रीडाजळगावताज्या बातम्या

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी विजेता    

फिडे मानांकित खेळाडूंसह राज्यातील १२३ जणांचा सहभाग   

जळगाव (प्रतिनिधी)  : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्व. उदयसिंह वेद व स्व. निलेश आशर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २६ जानेवारी रोजी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगावच्या तसीन तडवी याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ५,५०० रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, शोभा वेद, आरती आशर व अमरसिंग बोरसे यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यासह मुंबई, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व गोवा येथील एकूण ४० फिडे मानांकित खेळाडूंसह १२३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यांमध्ये पार पडली. एकूण ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिके, ३२ चषक व ३३ पदके देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले.

स्पर्धेचा निकाल

रोख पारितोषिक व चषक विजेते : तसीन तडवी, गुणवंत कासार, शेखर शिरसाठ (अकोट), केतन पाटील, वैभव बडगुजर, साक्षी शुक्ला, विवेक चव्हाण (शहादा), पंकज पाटील, आकाश जाधवानी, मयूर बडगुजर

पदक विजेते : मंदार पाटील, देवेश कुलकर्णी, किरण सोनवणे, स्वप्नील विभांडिक, पार्थ आशर

वयोवृद्ध गट : प्रथम – चंद्रशेखर देशमुख, द्वितीय- पद्माकर करणकर (भुसावळ)

उत्कृष्ट महिला खेळाडू : तनिष्का राठी (नाशिक), अवंती महाजन, पल्लवी माळी, त्रिशा बिजागरे, ऐश्वर्या चौरसिया

वयोगटानुसार विजेते

७ वर्षे: वेद देव, अश्वतसिंग राजपूत

९ वर्षे: अभंग सोनवणे, तन्मय पवार, धैर्य साळवे

११ वर्षे: निशांत कवडे, गौरव बोरसे, कृष्णा साळुंके, स्वामी चव्हाण, युवान असावा, सारस नेहेते, ध्रुव जगताप, लोकेश पिंपळे, रणजयसिंग राजपूत, अर्णव कळस्कर

१३ वर्षे: रुद्राश तायडे, श्लोक वारके, रेयांश ललवाणी, कुशन चौधरी, अद्वैत सोनवणे, चिन्मय पिंपळे, विदित वाघ, देवेंद्र माळी, चैतन्य गुल्हाने, दुर्वाक राणे

१५ वर्षे: वैष्णवी परब, क्षितिज वारके, पियुष माळी, पार्थ नानकर, आदित्य गुजराथी, अथर्व नालनीकर, तन्मय पाटील, अंगद मंगलानी, मीत जानी, गौरव बारी

उत्तेजनार्थ पारितोषिके (पदके): सिया ललवाणी, मोहम्मद हैद्दी मो. अशपाक, वैष्णवी जोनवाल, वेदिका हरणे, नैतिक जोशी, लोकेश पाटील, श्रीराज वानखेडे, रुद्र तिवारी, हार्दिक पाटील, अश्विन टोनपे, संयम सुराणा

स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे, फिडे ऑर्बिटर अभिषेक जाधव तसेच आकाश धनगर, परेश देशपांडे व दिनेश ठाकरे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी व्रजेश वेद, जयेश वेद, हिरेन वेद, हेमंत वेद, हर्षल भाटिया, पल्लवी जोशी व प्रणाली कदम यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button