आरोग्यजळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रशासकीय

पाचोरा व भडगाव येथील मतदान केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जळगाव (प्रतिनिधी) : स्थानीय स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाचोरा व भडगाव नगरपरिषद हद्दीतील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.

पाहणी दरम्यान मतदान केंद्रांवरील प्रवेश, रांग व्यवस्था व मूलभूत सुविधा, मतदानाची गती, सुरक्षा व्यवस्था व निष्पक्ष मतदानाची खात्री, प्रशासनिक समन्वय, सहाय्य पथके व कर्मचारी कार्यस्थिती, कायदा-सुव्यवस्था नियंत्रण यंत्रणेची तयारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांनी मतदान प्रक्रिया नियमबद्ध, पारदर्शक, शांततेत व विना-बाधा पार पडावी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

भेटीदरम्यान सह आयुक्त, नगरविकास शाखा, जिल्हा परिषद, जळगाव, निवडणूक निर्णय अधिकारी, पाचोरा नगरपरिषद, निवडणूक निर्णय अधिकारी, भडगाव नगरपरिषद, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पाचोरा नगरपरिषद, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, भडगाव नगरपरिषद आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश
“मतदान प्रक्रिया ही वेळेवर, नियमाधारित, शिस्तबद्ध आणि पूर्णतः पारदर्शक राहिली पाहिजे. मतदारांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पूर्ण जबाबदारीने काळजी घ्यावी.”, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. तसेच जळगाव जिल्हा प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निष्पक्ष, शांततापूर्ण व सुसूत्र निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यास कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button