आरोग्यजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

शिवनेरी किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू जतन सहल

जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी किल्ला येथे “ऐतिहासिक वास्तू जतन” शिक्षण उपक्रमांतर्गत सहल आयोजित करण्यात आली. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल पार पडली.

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन बालेकिल्ला, गर्भगृह, तटबंदी, पाण्याच्या टाक्या तसेच प्राचीन शस्त्रास्त्रांचे निरीक्षण केले. मार्गदर्शक शिक्षकांनी वारसा जतन, किल्ल्यावरील स्वच्छता, इतिहास संवर्धन आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

माध्यमिक विभागाच्या शंभर विद्यार्थ्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून “आपला वारसा – आपली जबाबदारी” हा संदेश दिला. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत इतिहास जतनासाठी पुढेही असे उपक्रम राबविण्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button