क्रीडाजळगावताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात “पायरेक्सीया २०२६” चा थाटात शुभारंभ

केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन ; पाच दिवस विविध स्पर्धा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिरथ बॅचतर्फे पायरेक्सीया २के२६ या क्रीडा स्पर्धांचे मंगळवारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला. दि. २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, फुटबॉल, बॅडमींटन आणि फुटसल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉक्टर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button