आरोग्यअभिवादनजळगावताज्या बातम्या

मास्टरिंग एअरवे मास्टरी कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : येथील इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव, जळगाव ॲनेस्थेशिया सोसायटी आणि इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, मास्टरिंग एअरवे मास्टरी: कॉम्पॅशनेट केअर इन क्रिटिकल मोमेंट्स या विषयावर डिफिकल्ट एअरवे कार्यशाळेचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले.

आयएमए हॉल येथे झालेल्या कार्यशाळेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ संभाजीनगर येथील ओझोन ग्रूप ऑफ अनास्थेशिया आणि भारतीय भूल संघटना संभाजीनगरचे सदस्य डॉ.बाळाजी आसेगावकर , डॉ. सुजित खाडे , डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ.सुजाता झिने, डॉ नयना जोशी यांनी मार्गदर्शन केले. रुग्णांना गंभीर परिस्थितीत श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास तातडीने व प्रभावी उपचार कसे करावे, याबद्दल डॉक्टर्सना अद्ययावत ज्ञान आणि कौशल्ये देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

या कार्यशाळेत आयएमए जळगावच्या ॲकॅडेमिक चेअरमन डॉ. लीना पाटील यांनी विशेष सहभाग घेतला. याव्यतिरिक्त, डॉ. प्रमोद अपसिगेकर, डॉ. अमित हिवरकर आणि डॉ. राहुल महाजन यांनी एअरवे व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रे विषयांवर महत्त्वपूर्ण सादरीकरण केले. डॉ. अभिनय हरणखेडकर, डॉ. रवींद्र पाटील,डॉ. प्रतीक काबरा, डॉ. सागर व्यास, डॉ. धीरज चौधरी आणि डॉ. सोनाली महाजन, डॉ. सुवर्णा जोशी यांनीही कार्यशाळेतील वेगवेगळ्या सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

कार्यशाळेत केवळ व्याख्यानेच नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोटेशन पद्धतीने प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे सहभागी डॉक्टरांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. याप्रसंगी तज्ज्ञ वक्त्यांनी प्रत्याशित आणि अप्रत्याशित, डिफिकल्ट एअरवे, एअरवे उपकरणे आणि त्यांचे क्लिनिकल महत्त्व, क्रायोथायरॉइडॉटॉमी यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे आणि आयएमए सचिव डॉ. भरत बोरोले यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button