अभिवादनजळगावताज्या बातम्यासामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वलधाम गोगामेढी बहु. संस्थातर्फे सामाईक अभिवादन…

जळगाव (प्रतिनिधी) : येथील नवलधाम गोगामेढी बहूउद्देशीय संस्थातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त सामाईक अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा दलित नेते शिवचरण ढंडोरे, आमदार राजुमामा भोळे व माजी नगरसेवक भगत बालाणी यांच्याहस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरण ढंडोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण सर्व समाजाने व युवा पिढीने आपल्या जीवनात करणे म्हणजे हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन समजावे, बाबासाहेबांचे विचार आजच्या युगाला समजणे जास्त गरजेचे आहे. सविधानाचे वाचन करून समजणे आवश्यक आहे, तरुणांनी व्यसना पासून दूर राहावे युवकांनी प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अतिउत्सहाणे भाग घ्यावे, असेहि ते म्हणाले.

यावेळी भाजप जिल्हा नगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मेहतर समाजाचे सरपंच संदीप ढंडोरे, आत्मचरण ढंडोरे, बंशी डाबोरे, नरेश ढंडोरे, चित्रा मालपाणी, खालिद एलेकार, आनंद सपकाळे, पिंटू सपकाळे, राजु मराठे, महेश चौधरी, अजित राणे, मनोज सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्रिशरण व पंचशील आणि भीमस्मरण बौद्ध आचार्य संतोष गायकवाड व सुभाष सपकाळे यांनी सामाईक रित्या ग्रहण केले.

यशस्वीतेसाठी श्री नवलधाम गोगामेढीचे अध्यक्ष आशितोष ढंडोरे, किसन निधाने, रोहित बेंडवाल, विलास मेघे, सुनिल सपकाळे, महेश शिंदे, ईश्वर पवार, संजू गोयर, राजु डाबोरे, छोटू करोसिया, शंकर डाबोरे, पंडित पुरुषोत्तम कंडारे, अजय ढंडोरे, मनोज जयराज, हर्षल ढंडोरे, भोपू अठवाल, मंगल गोडाले, उमेश गोयर, बाबू धवलपुरे, निखिल बेंडवाल, विकी नन्नवरे, शंकर अंभोरे, शुभम गोडाले, उदय तंबोली, बंटी खरात, अनिल टाक, चंद्रविर ढंडोरे, पुष्कर ढंडोरे, ध्रुव लोट, राजविर ढंडोरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार संदीप ढंडोरे यांनी केले. शेवटी सरानत्तय होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button