जळगावताज्या बातम्याधार्मिकशैक्षणिक

रावेरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात रक्षाबंधन सण साजरा

रावेर (प्रतिनिधी) : नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. या सणानिमित्त येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात सुरूवातीला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली.

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या आणल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर गिफ्ट दिले. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात.

भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button