
रावेर(प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्राथ. व माध्य.) रावेर आणि स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व विभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक सूर्यनमस्काराने करण्यात आली. त्यानंतर स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून योगाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
अनिता पाटील यांनी ध्यानधारणा (Meditation) व विविध योगासने घेऊन उपस्थितांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले. तसेच स्पोर्ट आणि डान्स टीचर युवराज महाजन सर व सुनील पवार सर यांनी जोशपूर्ण एरोबिक्स व झुंबा सत्र घेऊन सर्वांमध्ये ऊर्जा व उत्साह निर्माण केला.
या कार्यक्रमास स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे चेअरमन मा. रविंद्र पवार सर तसेच डायरेक्टर सौ. मनीषा पवार मॅडम यांचे सदैव लाभणारे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.
यावेळी ६ जून रोजी रायगड येथे पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित लाठी-काठी स्पर्धेत सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन करणारी स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी परि जीवन महाजन हिचा शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल उपस्थितांनी तिचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हिरकणी धांडे मॅडम, मुख्याध्यापक राजू पवार सर, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य रातिश मोन ए. व्ही.सर, कीर्ती कानुगो मॅडम, अनिता पाटील मॅडम, शिरीष मैराडे सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
योग, ध्यान, सूर्यनमस्कार आणि झुंबा यांच्या संगमातून आरोग्य, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थितांनी नियमित योगाभ्



