
रावेर (प्रतिनिधी): तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या निपुण भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी चिंचाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उपक्रम, विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा विकास तसेच पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तसेच केंद्र प्रमुख उपस्थित होते. यावेळी शाळांमधील निपुणतेची सद्यस्थिती, गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि शिक्षकांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत विविध शाळांच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणित विषयातील मूलभूत कौशल्ये प्रभावीपणे आत्मसात करता यावीत यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



