शैक्षणिकजळगावताज्या बातम्या

स्वामी इंग्लिश मेडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चा बारावी परीक्षेत दैदिप्यमान निकाल; विद्यार्थ्यांची शानदार कामगिरी

रावेर (प्रतिनिधी): शाळेचा एकूण निकाल 96% लागला असून विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये प्रार्थी अजय पाटील हिने 81.17% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच नंदिनी विजय तलरेजा हिने 79.67% गुणांसह द्वितीय तर संचिता विजय महाजन हिने 77.17% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र राजाराम पवार, सचिव सौ. मनिषा रवींद्र पवार, प्राचार्य डॉ. रतिश मोन तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष व सचिव यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांवर शाळा परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून पालक व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button