
जळगाव (प्रतिनिधी): नाशिक येथे आयोजित ‘आरोह–२०२६’ आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील डॉ. निकेतन जाधव यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील सुमारे २० स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. निकेतन जाधव यांनी ‘ए मेरे दिल तू गाये जा’ या गीतावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे स्पर्धेत रंगत आली.
या स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, डॉ. प्रशांत गुंडे, तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले



