जळगावताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ :

एका संघर्षमय प्रवासाची दमदार सुरुवात!

जळगाव (प्रतिनिधी): गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा वीजेसारखा अंकुर दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव येथे रोवण्यात आला.

हा दिवस म्हणजे संघटनेचा पहिला ऐतिहासिक कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात संघटनेच्या पहिल्या जिल्हाध्यक्षापासून ते राज्य उपाध्यक्षांपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या.

जळगाव जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक पत्रकार बांधवांची उपस्थिती ही या संघटनेवरील विश्वासाची साक्ष देणारी ठरली.
संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की —

ग्रामीण भागात उभा असलेला, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहणारा आणि आपल्या प्रामाणिक लेखणीने ते अश्रू पुसणारा पत्रकार म्हणजेच ग्रामीण पत्रकार! याच विचारांवर उभी राहणारी ही संघटना अल्पकाळात राज्यभर आपली ठाम ओळख निर्माण करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम

संस्थापक महासचिव भगवान सोनार यांनी आजच्या काळातील पत्रकारितेतील आव्हाने समजावून सांगत पत्रकारांना शैक्षणिक व भावनिक मार्गदर्शन केले. संस्थापक उपाध्यक्ष रवींद्र पवार यांनीही पत्रकारांना मार्गदर्शन करत संघटनेच्या मजबूत वाटचालीचा संकल्प मांडला. कार्यक्रमास संस्थापक सदस्य जोशीला पगारिया, गणेश पाटील व सागर ओतारी यांची उपस्थिती लाभली.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी पत्रकारांनी अडचणींना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन करत संघटनेची मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत दिले.

तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव यांनीही पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी चेतन वाणी यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून संघटनेचे जिल्ह्याचे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात सक्षम टीम गठीत करण्यात आली. सचिव पदी मंगल पाटील उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी संघटक पदी राकेश वाणी जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत पाटील व शहराध्यक्ष म्हणून जितेंद्र कोतवाल यांची निवड करण्यात आली

चाळीसगाव येथील मुराद पटेल यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव साठी संघटनेची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली.
पाचोरा येथील विनायकराव दिवटे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या ऐतिहासिक कार्यक्रमात पत्रकारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
लवकरच चोपडा रावेर सावदा मुक्ताईनगर पारोळा एरंडोल तसेच नाशिक पुणे मुंबई येथे सुद्धा आगामी तीन महिन्यात संघटनेच्या शाखा स्थापित होतील याची गवाही संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी दिली।
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
ग्रामीण पत्रकारांचा आवाज बुलंद करणारी संघटना म्हनेजच– गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button