
रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने सलग दुसऱ्या दिवशी गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोन आरोपींना अटक केली आहे.
रसलपूर, ता. रावेर येथून काही इसम बऱ्हाणपूर मार्गे गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, गुन्हे शोध पथकाने २० जानेवारी २०२६ रोजी रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील हॉटेल क्रिशलजवळ सापळा रचला. सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास, MH-04-EY-0343 क्रमांकाचे एक छोटे हाती वाहन तिथे आले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता, त्यात गोवंश सदृश मांसाने भरलेली पाच पोती आढळली.
वाहनाचा चालक, शेख मुस्ताक शेख इसाक (रा. कुरेशी वाडा, रसलपूर) आणि त्याचा साथीदार मो. इलियास मो. याकुब (रा. बऱ्हाणपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम, १९९५ (सुधारित २०१५) आणि भारतीय न्याय संहीता, २०२३ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी एकूण ₹१,५०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला, ज्यात सुमारे २५० किलो वजनाचे गोमांस (किंमत ₹५०,०००) आणि पिवळ्या रंगाचे टाटा कंपनीचे छोटे हाती वाहन (किंमत ₹१,००,०००) यांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष मांसाचे नमुने घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पो.उप. निरीक्षक तुषार पाटील, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.कॉ. प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, आणि विशाल पाटील यांनी केली. पुढील तपास पो.हे.कॉ. योगेश महाजन हे करीत आहेत.




