जळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारसामाजिक

रोटरी व्होकेशनल एक्सलन्स, लीडरशिप अवॉर्ड प्रदान

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल मध्ये रोटरी व्होकेशनल सर्विस एक्सलन्स व लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जळगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, संवाद सचिव पंकज व्यवहारे, व्होकेशनल कमिटी चेअरमन राजेश वेद यांची विशेष उपस्थिती होती.

यांचा झाला गौरव
यावेळी भालचंद्र पाटील (सहकार -उद्योग), मीनल करनवाल (प्रशासन), डॉ. अपर्णा भट – कासार (सांस्कृतिक), जयदीप पाटील (शैक्षणिक), विजय डोहोळे (माध्यम), अनिल जोशी (उपाध्यक्ष मीडिया डिपार्टमेंट जैन इरिगेशन), डॉ. गिरीश सहस्रबुद्धे (वैद्यकीय), हर्षाली चौधरी (सामाजिक), महेश व मनीष चिरमाडे (ध्वनी व्यावसायिक), शंकर जावळे (टाईप सेटिंग), किरण महाजन (भाजी विक्रेते) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रास्ताविक राजेश वेद यांनी तर सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले. परिचय डॉ. तुषार फिरके यांनी तर आभार महेश पाटील यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button