जळगाव ‘भाजप’मध्ये मोठी कारवाई; शिस्तभंगाचा ठपका ठेवत ‘या’ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी!

जळगाव (प्रतिनिधी) : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्त कायम राखण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भाजपमधील तब्बल तब्बल २७ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असून संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षाचे हित आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ही कार्यवाही केली आहे.
संबंधित पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेली सर्व पदे तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहेत. पक्षाच्या धोरणांविरुद्ध वर्तन करणे आणि शिस्तभंग करणे हे या कारवाईचे मुख्य कारण आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही, जो कोणी शिस्त मोडेल त्यावर अशीच कारवाई होईल,” असा स्पष्ट संकेत या निर्णयाद्वारे भाजपने दिला आहे.
हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यादी:
१: पाटील संगिता गोकुळ
२: हर्षदा अमोल सांगोरे
३: बाविस्कर धनश्री गणेश
४: बाविस्कर गणेश दत्तात्रय
५: सपकाळे रंजना भरत
६: कांचन विकास सोनवणे
७: शिंपी प्रमोद शांतांराम
८: सपकाळे भरत शंकर
९: बागरे हिरकणी जितेंद्र
१०: चौधरी चेतना किशोर
११: बारी मयुर श्रावण
१२: पाटील तृप्ती पाडुरंग
१३: पाटील सुनिल ज्ञानेश्वर
१४: विकास प्रल्हाद पाटील
१५: भोळे गिरीष कैलास
१६: कैलास बुधा पाटील (सुर्यवंशी)
१७: हेमंत सुभाष भंगाळे
१८: जितेंद्र भगवान मराठे
१९: प्रिया विनय केसवानी
२०: चौधरी रुपाली स्वप्नील
२१: अंजू योगेश निंबाळकर
२२: चौथे मयुरी जितेंद्र
२३: वंजारी जयश्री गजानन
२४: पाटील ज्योती विठ्ठल
२५: घुगे उज्वला संजय
२६: ढाकणे दिनेश मधुकर
२७: मोरे कोकीळा प्रमोद




