परेड संचलन व हर्ष फायर करून ‘महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन’ उत्साहात साजरा

जळगाव पोलीस मुख्य कवायत मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : ‘पोलिस रेझिंग डे’ (Police Raising Day) अर्थात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन जळगांव पोलीस मुख्य कवायत मैदानावर दि.२ रोजी पोलीस परेड संचलन व हर्ष फायर करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून सकाळी 8:55 वाजता पोलीस कवायत मैदानावर पोलीस परेड संचालनाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थिती होते.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार उपस्थित होते. परेडचे कमांडर SDPO भुसावळ केदार बारबोले, RSI सचिन चिवंडे हे सेकंड परेड कमांडर होते. परेड संचलन करिता 9 पोलीस अधिकारी, 222 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
2 जानेवारी 1961 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता. तो दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून घोषित केला गेला. या दिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम आणि जनजागृती मोहिम राबवल्या जातात.
जिल्हाधिकाऱ्यांना दिली मानवंदना
सुरुवातील प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे स्वागत करून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रीय सॅल्युट, हर्ष फायर करून ध्वजसंचलन, परेड निरीक्षण झाले. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. तसेच जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
परेडनंतर मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले शांतिदूत संघटनेचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी, शालेय विदयार्थी, पोलीस कुटुंबीय यांचे भेटी घेतल्या. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सतीश गोराडे, संजय गायकवाड, कावेरी कमलाकर, फारुख तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वाल्डे यांच्यासह शहरातील पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
यशस्वीतेसाठी मुझ्झफर सैय्यद, राजेश वाघ, पंडित वानखेडे, रज्जाक अली सैय्यद, संभाजी पाटील, नरेंद्र वारुळे, जयवंत चौधरी, चंद्रकांत पाटील, जितेंद्र चौधरी, संजय महाजन, संतोष सुरवाडे, मेघना जोशी, किरण सपकाळे, सुभाष धिरबस्ती, संदीप पाटील, पंकज शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले. परेड संचलन कार्यक्रमास ला.ना.विद्यालय, इकरा विद्यालय, का.उ. कोल्हे विद्यालय, पं.न. लुंकड हायस्कूल, के.के. उर्दू विद्यालय, ए.टी. झांबरे विद्यालयमधील विध्यार्थी उपस्थित होते.




