आरोग्यजळगावताज्या बातम्यासामाजिक

रोटरी क्लब जळगावतर्फे वैद्यकीय शिबिरात साडेपाचशे रुग्णांची तपासणी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे येथे मोफत रोगनिदान व उपचार शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात पंचक्रोशीतून सुमारे ५५० हून अधिक गोरगरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, मेडिकल कमिटी चेअरमन डाॅ. जयंत जहागिरदार व प्रकल्प को-चेअरमन राकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शिबीराचे नियोजन करण्यात आले होते.

शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जगताप, जितेंद्र ढाके, उदय पोतदार, योगेश गांधी, संदीप शर्मा, शाम अग्रवाल, मनोज जोशी, सुबोध सराफ, कॅप्टन मोहन कुलकर्णी. किशोर तलरेजा, नित्यानंद पाटील, अरविंद हसवाणी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या प्रास्ताविकात अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र राकेश चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित हे शिबीर आपल्या गावाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणारे आहे. गावातील गरजूंसाठी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून दरवर्षी हे शिबिर आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचक्रोशीतील वरखेड, खामखेडे, वाकटुकी, सोनवद, बोरखेडा, झुरखेडा, वंजारी खपाटसह परिसरातून आलेल्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले. औषधींसह, दोनशे हून अधिक गरजूंना विनामूल्य चष्मे देण्यात आले. मोफत तपासणी आणि उपचार मिळाल्याने रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. उपस्थित डॉक्टरांनीही उत्साहाने सेवा देत शिबिर यशस्वी केले.

बालकांची तपासणी डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. श्रुती काबरा यांनी तर जनरल तपासणी डाॅ. महेश पाटील, डाॅ. लिना बडगुजर यांनी केली . डोळ्यांची तपासणी डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, डॉ. निरंजन शिंदे, डॉ. कृष्णा गायके, डॉ. प्रतिक खेवलकर, डॉ. प्राजक्ता शिंदे, डॉ. तन्मयी म्हस्के, डॉ. अनघा गाभाने, डॉ. श्रेया कांबळे,डॉ. पूनम शिंदे, डॉ. अनुपम सिंग, डॉ. मृणाल पाटील, दामोदर चव्हाण, लक्ष्मण पाटील, डॉ. रोहित पाटील यांनी तसेच महिलांची तपासणी डाॅ. साधना पाटील, डॉ. माधुरी कासट, डॉ. जयश्री महाजन, डॉ. लीना बडगुजर, डाॅ. मीना चव्हाण यांनी आणि दातांची तपासणी डाॅ. कृत्तिका अडवाणी यांनी केली.

नोंदणीचे काम रोटरी सदस्य रितेश जैन, विश्वजित बऱ्हाटे, चंदन महाजन, पराग अग्रवाल, योगेश चौधरी यांनी केले. औषधी व्यवस्थापन विजय जोशी व गणेश माळी यांनी केले. शाम अग्रवाल, नितीन काळुंखे, उल्हास सुतार यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले. सरपंच गणेश चव्हाण, माजी सरपंच अरुण पाटील, माजी पोलिस पाटील रविंद्र चव्हाण, डाॅ. विलास चव्हाण यांच्या पुढाकारामुळे शिबिर यशस्वी ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button