आरोग्यक्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारशैक्षणिक

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कुलदीप महाजनचे यश!

रावेरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्राथमिक शाळेमधील दुसरीतील विद्यार्थ्याने नमविले MBBS च्या विद्यार्थांना

रावेर (प्रतिनिधी) : भुसावळ येथील IMA हॉल, शांती नगर येथे १४ डिसेंबर रोजी लायन्स क्लब व ज्ञानरत्न – क्रीडातर्फे खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रावेर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्राथमिक शाळेमधील दुसरी सेमीतील कुलदीप निलेश महाजन याने MBBS च्या विद्यार्थांना नामवित यश संपादन केले आहे. या स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला असून या यशाबद्दल त्याचे शाळेने अभिनंदन केले आहे.

या यशाबद्दल स्वामी परिवाराचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनिषा पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याधापक राजू पवार, मुख्याध्यापिका धांडे मॅडम, पर्यवेक्षिका निळे मॅडम, क्रीडाशिक्षक मंगेश महाजन, विष्णू चारण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल त्याला स्वामी स्पोर्ट्स क्लबचे सर्व आजी- माजी खेळाडूंचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button