आरोग्यआर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीयसमस्या

साडेसात किलो गांजासह एक स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद!

१,८८,६२५ रुपयाचा सुका पालापाचोळा असलेला गांजा जप्त, धरणगाव पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगांव ते चोपडा जाणा-या रोडावरील शासकीय आट.टी.आय जवळ एका व्यक्तीला अवैध गांजासह धरणगाव पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून १,८८,६२५रु.कि.चा सुका पालापाचोळा असलेला ७ किलो ५४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगांव ते चोपडा जाणा-या रोडावरील शासकीय आट.टी.आय.जवळ गोणीत सुका पालपाचोळा गांजा बाळगणारा इसम असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच धरणगांव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष पवार व अंमलदार यांनी एकत्रीत येवुन हर्षल संतोष गारुंगे (वय-२०, रा-जळगांव) याला अटक केली. त्याच्याकडून १,८८,६२५/- रु.कि.चा सुका पालापाचोळा असलेला ७ किलो ५४५ ग्रॅम वजनाचा गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, धरणगांव पोलिस स्टेशनचे संतोष पवार मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोह विष्णु वि-हाडे, दिपक माळी, पोह, रविंद्र पाटील तसेच धरणगांव पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, पोह. सुधीर, पोकॉ, संदिप पाटील, किशोर भोई यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button