पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भाजपा जिल्हा महानगर तर्फे सेवा पंधरवडा राबवणार : आ.सुरेश भोळे

जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे महत्त्वपूर्ण बैठक शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा)आणि जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये १७ सप्टेंबर रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या समितीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला आ. सुरेश भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी तसेच सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे व उदय भालेराव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन जयेश भावसार यांनी केले.
प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांचा विशेष सत्कार
याप्रसंगी शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांचा विशेष सत्कार आ. राजूमामा आणि जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
बैठकीला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी , नितीन इंगळे, जयेश भावसार , भारतीताई सोनवणे , प्रदेश सदस्य संतोष इंगळे तसेच सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंधरवाडा कार्यक्रमाची समिती अशी
सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची समिती पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. जिल्हा संयोजक :- विजय वानखेडे,
जिल्हा सह- संयोजक : ज्योतीताई निंभोरे, जिल्हा सह- संयोजक : सागर पाटील, जिल्हा सोशल मीडिया: अक्षय चौधरी. सेवा पंधरवडा अंतर्गत कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे संयोजक खालीलप्रमाणे : स्वच्छता अभियान : संयोजक : राजेंद्र मराठे, ‘एक पेड माँ के नाम’ (वृक्षारोपण कार्यक्रम करावा): संयोजक: भारतीताई सोनवणे, रक्तदान शिबीर : संयोजक: महेश पाटील, आरोग्य शिबीर : संयोजक: डॉ.मनोज टोके, पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित जीवनपट फिल्म प्रकाशित : संयोजक: खंबायत, प्रबुध्द नागरिक संवाद : संयोजक: भूषण लाडवंजारी – सह संयोजक: सुनील वाणी, दिव्यांग व अन्य प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान :- संयोजक: डॉ.चंद्रशेखर पाटील, वोकल फॉर लोकलचा प्रसार : संयोजक: संतोष इंगळे, पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकांचे वाटप: संयोजक: राजेंद्र घुगे पाटील, खासदार क्रिडा चषक स्पर्धा: – संयोजक : अरुण श्रीखंडे, सह संयोजक: निलेश बाविस्कर, विकसित भारत चित्रकला स्पर्धा : संयोजक: शिरीष तायडे, मोदी विकास मॅरेथॉन : संयोजक: महेश पाटील (युवा मोर्चा), पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर : संयोजक: प्रकाश बालाणी, पंडित दीनदयाळ जयंती २५ सप्टेंबर : संयोजक: ॲड.शुचिता हाडा, गांधी जयंती – २ ऑक्टोबर : संयोजक: प्रदिप रोटे.




