२०० विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुढाकार
उत्राण अ.ह., ता. एरंडोल (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्राण अहिर हद्द येथील २०० विद्यार्थ्यांना महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच मोफत प्रदान करण्यात आले आहे.
ही उपक्रमशैली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष भागवत भिकन पाटील यांच्या सौजन्याने शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून साकारण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अमोल महाजन आणि संचालक विलास महाजन यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना संरक्षण कवच मिळवून दिले.
विमा प्रमाणपत्रांचे वितरण
गावातील मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्रांचे औपचारिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर बियाणी होते. यावेळी सरपंच आनंदा धनगर, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले, डॉ. मगन महाजन, राजू पवार, दत्तू पाटील, प्रकाश कुवर, गणेश चौधरी, अमोल पाटील, सोनू कोळी, लखन लोहारे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक कैलास साळुंखे, अनिल पाटील,राजू पाटील, राजेश सोनवणे, युवराज वानखेडे, नितीन पाटील, भूषण पाटील व सर्व शिक्षकवृंद पालक आणि ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल महाजन यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश कुवर व डॉ.मगन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सूत्रसंचालन व आभार राजेश सोनवणे यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षा देखील महत्त्वाची – भागवत पाटील
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अपघाती सुरक्षिततेसाठी एक भक्कम आधार मिळाला असून, गावकऱ्यांनी या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून भागवत पाटील यांनी दिला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.




