क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीयसमस्या

९ वर्षापूर्वी विनयभंग करणाऱ्या फरार आरोपीला अखेर अटक!

मेहुणबारे पोलिसांची कारवाई, न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी

जळगाव (प्रतिनिधी) : मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे 2016 मध्ये महीलेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील ९ वर्षापासून फरार आरोपीला अखेर पोलिसांनी मुंबईहून ताब्यात घेतले आहे.

युवराज नामदेव पवार (रा. शिरसगांव ता. चाळीसगांव) असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांनी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहीजे / फरार आरोपींना अटक करुन योग्य ती कार्यवाही करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे महीलेचा विनयभंग करणारा आरोपी यूवराज पवार हा गुन्हा केलेपासून 9 वर्षे फरार होता. सदरचा गुन्हा हा महीलांचे बाबतचा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीस अटक करणे आवश्यक होते.

तांत्रिक पध्दतीने तपास करून केली कारवाई
त्याचा शोध घेत असताना तो मुंबई येथे असलेबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. आरोपीचा शोध घेणेकामी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक नेमले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपीचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन त्यास अंधेरी, मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे घेवून आले. त्यानंतर आरोपीस नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्याची न्यायालयीन कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
ही कामगिरी वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ शांताराम पवार, पोकों विनोद बेलदार, संजय लाटे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button