
यावल (प्रतिनिधी): यावल तालुक्यातील एका गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याची घटना समोर आली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून संबंधित महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर महिलेला तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



