वसंतराव नाईक जयंतीनिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील कार्यक्रमात स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, तसेच विधिमंडळाचे सदस्य, विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही विधानभवन परिसरात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादनाचा कार्यक्रम साध्या व भावपूर्ण वातावरणात पार पडला.




