क्राईमजळगावताज्या बातम्या

मुक्ताईनगरात मोठी कारवाई; सोन्या-चांदीसह शस्त्रसाठा जप्त

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या तपासादरम्यान पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यात धडक कारवाई करत सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३०० ग्रॅम सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, पिस्तूल, जिवंत काडतुसे, वन्यजीवांच्या कातड्या तसेच विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य हस्तगत करण्यात आले.

पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून रोख रक्कम, ३०० ग्रॅम सोने, चांदीचे दागिने, दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, हरिण व काळवीटाच्या कातड्या, चारचाकी वाहन, संगणक साहित्य, मोबाईल फोन आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त केल्या.

या प्रकरणात अनेक संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा आर्थिक फसवणूक, अवैध व्यवहार आणि वन्यजीव संरक्षण कायद्याशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

या मोहिमेत पोलिसांच्या विशेष पथकासह विविध शाखांतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना ऑनलाइन फसवणूक आणि संशयास्पद व्यवहारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button