एल एल.बी. अभ्यासक्रमात स्वरांगी देशपांडे हिने पटकावले ‘सुवर्ण पदक’

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे एप्रिल – मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एल.एल.बी. अभ्यासक्रमातील ज्युरिस प्रूडन्स (न्याय शास्त्र) विषयात सर्वात उच्च श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल कु. स्वरांगी मोहन देशपांडे (भुसावळ) हिस दि. 23 डिसेंबर रोजी विद्यापीठ प्रांगणात झालेल्या दीक्षांत समारोहात (कै. ऍड. प्रभाकर शिवराम राणे) सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे प्रोफेसर गणेशन कन्नीबिरन (बंगलोर), विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्रा. एल. टी. इंगळे यांच्या हस्ते सुवर्ण पदक, प्रमाणपत्र देण्यात आले. स्वरांगी देशपांडे ही सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे, व रेणुका देशपांडे भुसावळ यांची कन्या आहे. सुवर्ण पदक पटकावल्या बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




