जळगावताज्या बातम्या

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी व जनजागृतीसाठी आयोजित ग्राहक समाधान मेळाव्यास जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी स्वत: हजेरी लावत ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले.

         जळगाव शहरात डी मार्ट परिसरात बुधवारी (17 जून) स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्याचबरोबर काळानुरुप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची माहिती दिली. जुन्या चकतीच्या मीटर पासून ते इलेक्ट्रॉनिक मीटर, रेडीओ फ्रीक्वेन्सी मीटरपर्यंतचा होत गेलेला ग्राहकाभिमुख बदलांचा इतिहास सांगत स्मार्ट मीटर अधिक अचूक असून वीजग्राहकांचा जेवढा वीजवापर आहे तेवढाच नोंदवला जातो अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर रीडिंगमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळून नेमके वीजवापराचे बिल दिले जाते. मीटरमध्ये छेडछाड कय्न होणारी वीजचोरीही तत्काळ सर्व्हरला कळत असल्यामुळे वीजगळतीवरती नियंत्रण ठेवणे शक्य होत असल्याचे सांगत, स्मार्ट मीटरमुळे रिअल टाईम वीजवापर कळतो व ग्राहकांना वीजवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. दिवसा वीजवापरावर 85 पैसे प्रतियुनिट सूट मिळत असल्यामुळे वीजग्राहकांचाही यात लाभ होत असल्याचवे मुलाणी यांनी यावेळी सांगितले.

ज्या ग्राहकांना वाढीव वीजबिल येत आहे त्यांनी आपल्या घरातील अर्थिंग तपासून घ्यावी तसेच आरसीबी लावून घेण्याचाही सल्ला त्यांनी दिला. यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी उपस्थित होते.

दरम्यान, जळगाव शहरातील सालारनगर, तालुक्यातील म्हसावद, चोपडा तालुक्यातील लासूर व निमगव्हाण तसेच अंमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. महावितरणने सर्व ग्राहकांना संबंधित उपविभाग स्तरावर आयोजित मेळाव्यांना उपस्थित राहून स्मार्ट मीटरबाबत प्रत्यक्ष माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button