शेतकरीजळगावताज्या बातम्यासमस्या

आठ तासांऐवजी कमी वीजपुरवठा; शेतकऱ्यांचा संताप वाढला

रावेर (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा कमी वेळ मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये नियोजित वेळेपेक्षा कमी तास वीज मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

केळी, भाजीपाला तसेच इतर पिकांना नियमित पाण्याची गरज असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

या समस्येबाबत शेतकरी प्रतिनिधींनी संबंधित वीज वितरण कार्यालयात निवेदन देत तातडीने नियमित व पुरेसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button