जळगावताज्या बातम्या

खानापूर येथे विवाहितेचा गूढ मृत्यू; पती बेपत्ता झाल्याने संशय वाढला

रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील खानापूर येथे एका २८ वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित महिला घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेनंतर महिलेचा पती अचानक घरातून निघून गेल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाबाबत संशय अधिक गडद झाला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून लहान मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपास सुरू असून नेमके कारण समोर येण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button