जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेरची यशाची परंपरा कायम ; दहावीचा निकाल 95.60%

रावेर (प्रतिनिधी): यंदा महाराष्ट्र बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान यशस्वी होण्यासाठी अतिशय कडक पाऊल उचलण्यात आले. मंडळाकडून zoom meeting app द्वारे प्रत्येक वर्गात CCTV कॅमेराची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, बैठे पथक, भरारी पथक असा अतिशय कडक बंदोबस्त, नियमांमध्ये यावर्षी दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली.

असे असले तरीसुद्धा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर च्या विद्यार्थ्यांनी या परिस्थितीवर मात करून अभ्यासाच्या जोरावर तसेच शिक्षकांनी शाळेत घेतलेल्या सरावामुळे 26 विद्यार्थी 80 %च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले. तर शाळेचा यावर्षी निकाल हा ९५.६० टक्के इतका लागला. अर्थातच या यशाचे सर्व श्रेय हे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेत वर्षभरात घेतलेले मेहनत यामुळे हे सर्व शक्य झाले. सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये

🥇 प्रथम — स्वप्निल ईश्वर पवार — 92.60%
🥈 द्वितीय — हेमश्री सुनील पाटील — 91.60%
🥉 तृतीय — दक्षता पद्माकर पाटील — 89.60 %

या विद्यार्थ्यांनी देखील भरघोस यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र पवार, सचिव सौ. मनीषा पवार, डॉ. सुखदा पवार, संचालक पुष्पक पवार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्राचार्य श्री. राजू देवसिंग पवार , कीर्ती निळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वर्गशिक्षक वर्षा अहिरे मॅडम , रुपेश पाटील सर ,संदेश पाटील सर , यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व संपूर्ण रावेर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button