जळगावताज्या बातम्या

एमपीएससीकडून डिजिलॉकरद्वारे कागदपत्र सादर करण्याची सुविधा सुरू

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध भरती प्रक्रियांसाठी उमेदवारांना आता डिजिलॉकर प्रणालीद्वारे प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सोय मिळणार आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये डिजिलॉकर खाते लिंक करून आवश्यक कागदपत्रे थेट अपलोड करता येणार आहेत. आधार क्रमांकाच्या माध्यमातून डिजिलॉकर खाते तयार करून विविध शासकीय विभाग, विद्यापीठे व मंडळांकडून जारी केलेली प्रमाणपत्रे ‘Issued Documents’ विभागातून उपलब्ध होणार आहेत.

तसेच, डिजिलॉकरमध्ये उपलब्ध नसलेली कागदपत्रे उमेदवारांना पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्याची मुभा देण्यात आली आहे. आयोगाने सांगितले की, उमेदवारांनी दिलेली संमती ३० दिवसांसाठी वैध राहणार आहे.

आयोगाच्या या निर्णयामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि डिजिटल पद्धतीने पार पडण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात भरती प्रक्रियेत डिजिलॉकरचा वापर अधिक प्रमाणात वाढविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button