जळगावताज्या बातम्या

चिनावल येथे लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध

रावेर (प्रतिनिधी) : गावातील लिंगायत समाजाची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली स्मशानभूमीच्या जागेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली असून संबंधित जागेची कागदपत्रे समाजाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आली.

लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला होता. ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करत समाजाच्या मागणीला सहमती दर्शवली. त्यानंतर ग्रामसभेतही या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या मालकीची वाघोदा रस्त्यालगतची जागा स्मशानभूमीसाठी निश्चित करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून जागेची मोजणी पूर्ण करून संबंधित जागेचा ताबा देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या निर्णयामुळे लिंगायत समाजाची दीर्घकाळ प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button