शैक्षणिकजळगाव

बारावी निकालात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज ची यशस्वी घोडदौड; टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार

रावेर (प्रतिनिधी): शाळेचा एकूण निकाल 86% लागला असून विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये कुंजिका राजेश कानुंगो हिने 86.67% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच सार्थक अतुल महाजन याने 71.33% गुणांसह द्वितीय तर परम संजय चौधरी याने 70.67% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र राजाराम पवार, सचिव सौ. मनिषा रवींद्र पवार, प्राचार्य श्री. राजू देवसिंग पवार तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष व सचिव यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांवर शाळा परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून पालक व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button