
रावेर (प्रतिनिधी): दिनांक एक मे रोजी स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी ध्वजारोहण करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून दत्त मंदिर संस्थान चे सर्वेसर्वा आदरणीय श्री .ऋषिकेश महाराज लाभले. संचलन श्री आनंदकुमार सपकाळ यांनी केले तर सूत्रसंचलन श्री. विलास महाजन यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र पवार सर, व संस्था सचिव सौ.मनिषा पवार मॅडम यांनी या प्रसंगी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांची उपस्थिती होती



