
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कारागृहात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच बंदी बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले, तर काही बंदी बांधवांनी गीतांच्या तालावर नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला.
या उपक्रमामुळे कारागृहात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास प्रभारी अधीक्षक डी. जी. चव्हाण, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सी. व्ही. तायडे, तुरुंगाधिकारी दिलीपसिंग गिरासे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




